पार्किंगमधील वाहनांची जबाबदारी हॉटेलचीच: सर्वोच्च न्यायालय

सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (10:06 IST)
पार्किंगमधील गाडी चोरीला गेल्यास अथवा नुकसान झाल्यास 'मालकाच्या जबाबदारीवर पार्किंग' ('Parking at owners risk') अशी पाटी लावून कोणताही हॉटेल मालक आता अंग काढून घेऊ शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला आहे..
 
वाहन चोरीला गेल्यास अथवा वाहनाचं नुकसान झाल्यास त्यासाठी संबंधित हॉटेल व्यवस्थापनच जबाबदार असेल, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
 
1998ला नवी दिल्लीतील ताज महल हॉटेलमधून एका ग्राहकाची मारुती झेन ही कार चोरीला गेली होती. हॉटेल व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप करत 2.8 लाख रुपयांची नुकसान भरपाई या ग्राहकानं मागितली.
 
पण यासाठी हॉटेलनं नकार दिल्यानंतर प्रकरण राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर गेलं होतं. आयोगानं दिलेला निर्णय आता सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. जस्टिस एम. एम. शांतनागौदार आणि जस्टिस अजय रस्तोगी यांच्या खंडपीठानं यावर निर्णय दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती