कोरोना व्हायरस : पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध वाढवले

शुक्रवार, 12 मार्च 2021 (16:17 IST)
कोरोना व्हायरस प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कोणतेही नवे निर्बंध घालण्यात आले नाहीत. लोकांनी आधीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.
 
दरम्यान, जिल्ह्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार असून रात्रीची संचारबंदी कायम असेल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
 
शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सौरभ राव यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनसंदर्भात अधिक माहिती दिली.
 
सौरभ राव यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे -
18 वर्षाच्या वरील लोकांना लस देण्याबाबत पाठपुरवठा करणार

टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार

शाळा, महाविद्यालयं 31 मार्चपर्यंत बंद, 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना यातून शिथिलता

हॉटेल रात्री 10 वाजता बंद, दिवसभर 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवू शकणार

हॉटेलमध्ये रात्री 10 नंतर एक तास पार्सल सुरू राहणार

रात्री 11 पासून सकाळी 6 पर्यंत संचारबंदी

गार्डन संध्याकाळी बंद राहणार, सकाळी व्यायामासाठी सुरू राहणार

लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधी 50 पेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकणार नाही. अन्यथा गुन्हा दाखल होणार

मॉल रात्री 10 वाजता बंद होणार

रस्त्यावरील स्टॉलवर एकावेळी 5 लोक उभे राहू शकणार

सोसायटीमधील क्लब हाऊस बंद राहणार

MPSC क्लासेस, लायब्ररी 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार

नागरिकांनी नियम पाळण्याचं महापौरांचं आवाहन
दोन दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नव्याने निर्बंध घालण्याचा विचार आपण करत आहोत, त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन मोहोळ यांनी केलं होतं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती