छोटा राजन कोव्हिड उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल, मृत्यूच्या बातमीमुळे गोंधळ

शुक्रवार, 7 मे 2021 (17:30 IST)
अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी दिल्लीतल्या AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
दरम्यान, छोटा राजनचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
 
पण छोटा राजन अद्याप जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं AIIMSचे जनसंपर्क अधिकारी बी. एन. आचार्य यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
कोरोनाचा संसर्ग झाल्याने छोटा राजनला 26 एप्रिलला AIIMS मध्ये दाखल करण्यात आलं. 2015 मध्ये इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आल्यानंतर तिहार तुरुंगात राजनची रवानगी करण्यात आली होती.
 
छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी ऑल इंडिया रेडियो या सरकारी वृत्तसेवेनं दिली होती.
 
त्यानंतर मात्र काही वेळेनं एएनआय या सरकारी वृत्तसंस्थेनं छोटा राजन अद्याप जिवंत असल्याची बातमी दिली आहे.
राजेंद्र निकाळजे म्हणजेच अंडरवर्ल्डच्या दुनियेत छोटा राजन.
 
2015मध्ये इंडोनेशियातून ताब्यात घेतल्यानंतर छोटा राजनची रवानगी भारतातल्या तिहार तुरुंगात करण्यात आली.
 
राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावरच्या सगळ्या केसेस CBIने हाती घेतल्या. महाराष्ट्र सरकारने आपल्याकडच्या सगळ्या केसेस CBIकडे हस्तांतरित केल्या.
 
छोटा राजनवर खून आणि खंडणी संदर्भातील तब्बल 70 फौजदारी खटले सुरू आहेत.
 
(छोटा राजनचा मृत्यू झाला, अशी बातमी आधी 'ऑल इंडिया रेडिओ' या सरकारी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने आम्ही दिली होती.)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती