चेंबुरमधील 3 दिवसांच्या बाळाची चाचणी निगेटिव्ह

शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (16:27 IST)
मुंबईतील चेंबुर येथील खासगी रुग्णालयात प्रसूती झालेली महिला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर हे रुग्णालय सिल करण्यात आलं.
 
मात्र, कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत या नवजात बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. 
चेंबुर नाका येथील साई रुग्णालयात एका रुग्णाला कोरोना व्हायरस झाल्यानं त्याला दुसरीकडे हलवण्यात आले. मात्र, ज्या वॉर्डमध्ये हा रुग्ण होता, त्याचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं नव्हतं. धक्कादायक म्हणजे, याच वॉर्डात या रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला बाळासह ठेवण्यात आलं. त्यामुळं त्यांनाही लागण झाली.
 
मात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत बाळाचा अहवाल निगेटिव्ह आलाय, तर महिलेचा अहवाल अद्याप आलेला नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती