सुन्नी वक्फ बोर्ड सुप्रीम कोर्टात जाणार

वेबदुनिया

गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (17:26 IST)
अयोध्या प्रकरणी उच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाचा वादग्रस्त जागेवरील दावा फेटाळला आहे. यानंतर आता सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी सुन्नी वक्फ बोर्डाने न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु आज निर्णय जाहीर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

न्यायालयाचा निर्णय आता जाहीर करण्‍यात आला असून, या विषयी निकालपत्र वाचल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा