न्यायालयाचा निर्णय शांततेने मान्य करा-चिदंबरम

वेबदुनिया

गुरूवार, 23 सप्टेंबर 2010 (14:25 IST)
अयोध्येचा निकाल 24 तारखेला लागणार असून, न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी शांततेना पाळावा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे. न्यायालय या याचिकेवर एका पेक्षा अधिक निर्णय देण्‍याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या खंडपीठात तीन न्यायाधीश असल्याने ते अयोध्येच्या याचिकेवर एक पेक्षा अधिक निर्णय देण्‍याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

देशातील नेत्यांनाही चिदंबरम यांनी सूचना केली असून, निकालावर भाष्य करताना जबाबदारीचे भान त्यांनी ठेवावे असे चिदंबरम यांनी बजावले आहे.

वेबदुनिया वर वाचा