अयोध्येचा निर्णय 24 तारखेलाच लागणार

आयोध्येतील वादग्रस्त जागेचा निर्णय येत्या 24 सप्टेंबर रोजीच लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अलाहाबाद कोर्टाच्या लखनौ खंडपीठाने हा निर्णय लांबवण्‍यासंबंधीची याचिका फेटाळली आहे.

13 तारखेला या संदर्भात याचिका दाखल करण्‍यात आली होती. या संदर्भात न्यायालयाने आपला निर्णय सुनावला असून, आयोध्येचा निकाल येत्या 24 तारखेलाच लावला जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा