मेष - अपेक्षितांकडून उत्तम मदतीचा हात मिळाल्याने कामाचा वेग वाढेल. मात्र स्पर्धा, साहस टाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा व प्रकृती जपा. छान ग्रहमानात आपल्या कर्तृत्वाला उत्तम वाव मिळेल. कला, साहित्य, शिक्षण, व्यापार आदी क्षेत्रांचा समावेश होऊ शकेल. प्रवासाचे योग येतील.
वृषभ - परिचित मंडळी व परिवारातील व्यक्ती यांचा उपद्रव होण्याची शक्यता असते तेव्हा सावध राहा, सतर्क राहा. प्रतिकूल ग्रहस्थितीत संयमाने वागणे, सरकारी नियम पाळणे, गुप्तता पाळणे ह्या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते. अशा गोष्टींनी आपण आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवू शकाल. वरिष्ठांशी मिळतेजुळते घ्या.
मिथुन - प्रलोभने, आश्वासने यांपासून दूर राहा. आपल्या हातून चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. बौद्धिक गोष्टींचा वापर करून पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारा. स्वयंसिद्ध व्हा. प्रकृतीची पथ्ये पाळा. प्रतिकूल ग्रहमानात व्यवहाराची गणिते चुकतात व आपले अंदाजही चुकतात.
कर्क - यशाचा मार्ग सुलभ होईल. प्रवास कराल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल . आपली प्रतिमा चांगली ठेवता येईल . कलाक्षेत्रात प्राविण्य मिळवाल. खर्च वाढला तरी आवकही ठीक राहील. आपल्या योजनांमध्ये अडथळे आणू शकतात. स्पर्धा, साहस या गोष्टींपासून दूर राहा. काही चांगल्या घटना घडतील.
सिंह - कायदा व अधिकार यांच्या कचाट्यात सापडू नका. विचाराने वागा. प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या मोठ्या अपेक्षा करणे योग्य होणार नाही. नवीन समस्या, आव्हाने यांना आमंत्रण मिळते, पण या गोष्टीत चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.
कन्या - दूषित परिणामातून बाहेर पडण्यासाठी अथक प्रयत्नांची, हुशारीची जोड द्या. गणेशाची उपासना उपयोगी पडेल. काही महत्त्वाच्या समस्या सोडविणे शक्य होईल. आपल्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळू शकेल . सामाजिक स्तर उंचावेल. चर्चासत्र, बैठकी, जनसंपर्क, व्यापारी उलाढाली या गोष्टींचा चांगला लाभ घेता येईल .
तूळ : संरक्षण व्यवस्था याच काळात मजबूत करणे योग्य ठरते. तूळ व्यक्तींच्या संपर्क सफल योजना, परदेशात पोहचणे शक्य आहे. भक्तिमार्गातूनही आनंद मिळेल. संधी, मध्यस्थी, योग्य प्रसंग यांचा उपयोग करा. अधिकार वाढतील. पैसा मिळेल. नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल. आरोग्यावर औषध सापडेल. शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. श्रीमारुतीची उपासना, आराधना ठेवा.
वृश्चिक : आपली पावलं पुढे पडू लागतील. श्रीमारुतीची उपासना आराधना विचारातील निराशा कमी करते. यशस्वी नवीन प्रयोगातून काही प्रांतात प्रतिमा उजळून निघेल. यासाठी श्री मारुतीची उपासना, आराधना, प्रयत्नात संयम, शिस्त यांचा समन्वय ठेवा. व्यापार वाढेल, सत्ता प्रबल होईल, अर्थप्राप्ती मजबूत करता येईल. बौद्धिक प्रभावाने कार्यप्रांतात चमकाल.
धनु : . राशी कुंडलीमध्ये याच ग्रहांचा प्रभाव आहे. त्यातून अनेक क्षेत्रांतील धनू व्यक्ती आघाडीवर येऊ लागतील. आव्हाने प्रबल असली तरी शक्ती युक्ती समन्वय कार्यमार्ग निर्वेध करतो. त्यातून अर्थप्राप्ती वाढते. प्रतिष्ठा उंचावते. व्यापार भरभराटीला येतो. बौद्धिक क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. शासन, वादळी प्रश्न यांमध्ये मात्र सापडू नका.
मकर : प्रगतीचे अधिराज्य अनेक क्षेत्रांत त्यातून उभं करता येईल. बौद्धिक क्षेत्र, व्यवहारातील उलाढाल, राजकीय डावपेच, कलाविष्काराची प्रशंसा यांचा समावेश त्यात राहील. कृषी प्रयोग, नवीन परिचय, प्रवास, चर्चा, भागीदारी, मोठय़ा वर्तुळातील प्रवेश यांचा समावेश राहील.
कुंभ : प्रयत्न-उपक्रम यांचा समन्वय साधता येईल; परंतु सरळ मार्ग, प्रयत्न यांचा उपयोग सुरूच ठेवा. संधी अर्थप्राप्ती, सामाजिक प्रतिष्ठा, व्यापारी सौदे यासाठी लाभदायक ठरतील.
मीन : ग्रहकाळांत अनेक अवघड प्रकरण निकालात काढता येतील. नवीन उपक्रमांचे स्वरूप निश्चित करता येईल. बौद्धिक क्षेत्रात, राजकीय आणि व्यापारी प्रांतात मेष व्यक्तींचा प्रभाव वाढत राहणार आहे. साहसी प्रयोग कटाक्षाने टाळावे लागतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.