आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. बुधवारी (24 ऑगस्ट) त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणला या स्पर्धेसाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने प्रशिक्षण सुरू केले. नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोनातून बरा झाल्यावर संघात सामील होतील. प्रशिक्षणादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची भेट झाली.