IND vs PAK Asia Cup T20 : भारत-पाकिस्तान पुन्हा आमने सामने भिडणार

रविवार, 4 सप्टेंबर 2022 (10:45 IST)
आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. आठ दिवसांत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 फेरीतील हा पहिला सामना असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने गट फेरीत दोन सामने जिंकले. त्याचवेळी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने विजय मिळवला. पाकिस्तानने शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकला असला तरी, भारताला हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवणे कठीण झाले होते.
 
याआधीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. टीम इंडियाला हाच फॉर्म कायम ठेवायचा आहे आणि आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग पाचवा विजय नोंदवायचा आहे. 28 ऑगस्टच्या विजयापूर्वी भारताने 2016 मध्ये पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला होता. यानंतर 2018 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात नऊ विकेट्स राखून पराभव केला.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 फेरीचा हा सामना 4 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. पहिला चेंडू सायंकाळी साडेसात वाजता टाकला जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती