अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. त्याच्या या भक्तीपायी त्याचे वडील कल्याणीशेठ व गावकरयांनी त्याला बेदम मारून एका खोलीत कोंडून ठेवले. तेव्हा गणपतीने ब्राम्हणाच्या वेशात येऊन बल्लाळला दर्शन दिले. तेव्हापासून येथील गणपती बल्लाळेश्वर नावाने प्रसिध्द झाला.