श्री गिरिजात्मक

अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात 18 गुहा आहेत.


त्यातील 8 व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी 307 पायरया चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे.

मुख्य मंदिराशेजारी एक 53 फुट बाय 51 फुट लांब व 7 फुट उंचीचे सभागृह आहे. त्या सभागृहाच्या मध्ये कोठेही खांब नाही. कडेला फक्त 6 खांब आहेत. उत्तराभिमुखी असलेल्या मुर्तीची एकच बाजू सगळ्यांना दिसते.

या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.

जाण्याचा मार्ग :
पुणे नाशिक महामार्गावर जुन्नरजवळ हे देऊळ आहे. पुण्यापासून अंदाजे 96 किलोमीटरवर हे ठिकाण आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती