स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र
गोवर्धन धरं वंदे गोपालं गोपरू पिणम् ।
गोकुलोत्सव मीशानं गोविंदं गोपिका प्रियम् ॥
२. या मासात शक्यतो एक वेळेसच अन्नग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे.
३. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा.
४. या महिन्यात आपल्याला आवडणार्या वस्तूचा त्याग करावा. जसे एखादे खाद्य पदार्थ, एखाद्या रंगाचे वस्त्र, एखादी आवडणारी वस्तू वगैरे.
५. या महिन्यातील दानाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
हिंदू धर्मात मुलगी - जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. (अनारशा ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात.) या महिन्यात नारळ, सुपार्या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.