पहिले कार्ड निवडा


भविष्याच्या गर्भात काय आहे हे जाणून घेण्याची मानवी उत्सुकता आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. टॅरो ही अशीच एक पद्धत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय घडणार आहे याची सूचक माहिती यातून मिळते. त्यादृष्टीने नियोजन करण्यास सोपे जाते. सर्वप्रथम मध्ययुगीन कालखंडात युरोपात टॅरोचा वापर सुरू झाला. काहींच्या मते भारतातूनच ही भविष्यकथन पदधती तेथे गेली. इटलीत तिचा मोठा वापर होत होता. त्यानंतर जगभर तेथूनच या पद्धतीचा प्रसार झाला. टॅरोच्या गठ्ठ्यात ७८ कार्डे असतात. त्यांना मेजर आर्काना व मायनर आर्काना यांच्यात विभागले आहे. आर्काना हा शब्द लॅटीन भाषेतून आला आहे. भविष्याच्या पोटात दडलेली व्यक्तिगत माहिती सांकेतिक भाषेत मांडणे असा या शब्दाचा अर्थ आहे. टॅरो हा अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. शब्द व अंक यांच्या माध्यमातून टॅरो भविष्य जाणून गेता येते. ही पद्धत जगात खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे आता भविष्याच्या गुहेत टॅरोचा हात धरून कसे जायचे याची माहिती घेऊया.

टॅरो भविष्य कसे जाणून घ्यावे

  • आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे, त्याची सुरवातीला उजळणी करून घ्या. गोंधळ उडू नये यासाठी तो कागदावर लिहिला तरी चालेल.
  • यानंतर 'कार्ड निवडा' यावर क्लिक करा. आता एकामागोमाग एक तीन कार्ड निवडा.
  • पहिले कार्ड प्रश्न विचारताना तुमची मनःस्थिती काय आहे याविषयी माहिती देते.
  • तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती दुसरे कार्ड देते.
  • तिसरे कार्ड तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते.