योगातील सर्वोत्तम प्रक्रिया सूर्य नमस्कार, दररोज केल्यास राहाल निरोगी

शुक्रवार, 22 मे 2020 (19:36 IST)
शांती किंवा आनंद मानून घेणे म्हणजे अलौकिक ज्ञान मिळविण्यासारखे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण पूर्णपणे निरोगी असाल. उत्तम आरोग्य मिळविण्याचे तसे तर अनेक साधन आहेत पण त्यापैकी एक सोपे आहे योगासन आणि प्राणायाम.
 
सूर्य नमस्कार योगासनातील सर्वोत्तम प्रक्रिया आहे. याचे सराव साधकाला संपूर्ण व्यायामाचे फायदे मिळवून देतात. या व्यायामाचा सराव साधकाचे शरीर निरोगी, स्वस्थ आणि तेजस्वी बनवतं. सूर्य नमस्कार हे बायका, बालक, पुरुष, तरुण आणि वृद्धांसाठी फायदेशीर आहे. सूर्य नमस्काराचा सराव बारा परिस्थितीमध्ये केला जातो. जो या प्रमाणे आहे. 
 
1 दोन्ही हात जोडून सरळ उभे राहा. डोळे बंद करावे. आपले लक्ष 'आज्ञा चक्रावर' केंद्रित करावं. सूर्याचं आव्हान करून 'ॐ मित्राय नमः' मंत्र म्हणावं.
2 श्वास धरून दोनी हात कानाच्या बाजूने घेत वर ओढा. हात आणि मान मागील बाजूस वाकवा. लक्ष मानेच्या मागील बाजूस असलेल्या 'विशुद्धी चक्रावर' केंद्रित करावं.
3 तिसऱ्या स्थितीमध्ये श्वास हळुवार बाहेर सोडत पुढे वाकावे. हात मानेसकट कानाला लागून खाली घेऊन जाऊन पायाच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या जमिनीला स्पर्श करावे. गुडघे ताठ असायला हवे. कपाळ गुडघ्यांना स्पर्श करता करता लक्ष नाभीच्या मागील 'मणिपूरक चक्र' वर केंद्रित करतं काही काळ तश्याच स्थितीत थांबावे. कंबर आणि मणक्याचा त्रास असणाऱ्यांनी हे व्यायाम करू नये.
4 याच स्थिती मध्ये श्वास धरून डावा पाय मागे घेऊन जा. छातीला पुढे करा. मानेला मागे वाकवा, पाय ताठ, मागे वाकवलेले तळपाय सरळ उभ्या स्थितीत. या स्थितीत काही वेळ थांबा. लक्ष स्वाधिष्ठान किंवा विशुद्धी चक्राकडे लावावे. चेहरा सामान्य ठेवा.
5 श्वासाला हळू हळू सोडत उजवा पाय मागे करा दोन्ही पायाचे टाच जोडलेले. शरीराला मागील बाजूस ओढा. टाचांना जमिनीवर लावायचा प्रयत्न करा. शक्य असल्यास नितम्ब उचलावे. मानेला वाकवून हनुवटी गळ्यापर्यंत लावा. लक्ष 'सहस्त्रार चक्रा' कडे केंद्रित करण्याचा सराव करा.
6 श्वास घेताना शरीराला पृथ्वीच्या समांतर, सरळ साष्टांग दंडवत करा. प्रथम गुडगे, छाती, कपाळ जमिनीला लावावे. मागील भाग थोडंसं उंच उचलून श्वास सोडून द्या. लक्ष 'अनाहत चक्र' कडे केंद्रित करा. श्वासाची गती सामान्य करा.
7 या स्थितीत हळू हळू श्वास धरून, छातीला पुढे खेचून हात सरळ करावे. मान मागे टाकावी. गुडघे जमिनीला लावून तळ पाय सरळ ठेवा. शरीर ताठ करून लक्ष केंद्रित करा.
8 ही स्थिती- 5 व्या स्थितीप्रमाणे.
9 ही स्थिती- चौथ्या स्थितीप्रमाणे. 
10 ही स्थिती- तिसर्‍या स्थितीप्रमाणे 
11 ही स्थिती-  दुसर्‍या स्थितीप्रमाणे. 
12 ही स्थिती- पहिल्या स्थितीप्रमाणे. राहील.
 
सूर्य नमस्काराच्या वरील बारा स्थिती किंवा प्रकार आपल्या अंगातील सर्व विकृती दूर करून निरोगी ठेवतात. हे पूर्ण प्रकार फायदेशीर आहे. याचा सराव करणाऱ्याचे हात पायाचे दुखणे दूर होऊन ते बळकट होतात. तसेच मान, फुफ्फुस, आणि बरगड्यांचे स्नायू बळकट होतात. शरीरावरील जास्त चरबी कमी होते आणि शरीर हलकं होतं.
 
सूर्य नमस्कार केल्याने त्वचेचे आजार नाहीसे होतात. याचा नियमित सरावाने पोटाचे सर्व आजार दूर होतात. बद्धकोष्ठता सारखे त्रास नाहीसे होतात. पचन प्रणाली चांगली होते. यांचा सरावाने शरीरातील लहान मोठ्या नसा सक्रिय होतात. त्यामुळे आळस, निद्रानाश सारखे आजार दूर होतात.
 
चेतावणी : सूर्य नमस्काराचे तीसरे आणि पाचवे नमस्कार सर्व्हायकल किंवा स्लिप डिस्कचा त्रास असणार्‍यांनी करू नये. हे या रुग्णांसाठी करणे वर्जित आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती