योगासनाचे नाव आणि प्रकारांची माहिती

मंगळवार, 30 मार्च 2021 (17:27 IST)
प्राचीन काळापासून योग भारतात व्यायामाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या मध्ये अनेक प्रकारचे आसन केले जातात याला योगासनं असे म्हणतात. योग व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकरीत्या सुदृढ बनवतो. मनाला एकाच जागी स्थिर करण्याची प्रक्रिया योग आहे. योगासनाचे अनेक प्रकार आहे. चला काही प्रकारांची माहिती आणि नाव जाणून घेऊ या. 
 
 1 नमस्कार आसन - हे आसन योगाच्या सुरुवातीला केले जाते. या मध्ये सरळ उभारून हात जोडतात ही मुद्रा प्रार्थनेची आहे. 
 
2 वज्रासन - या योग मध्ये पाय दुमडून गुडघ्यावर बसतात. हे आसन पाठीच्या कामासाठी फायदेशीर आहे. 
 
3 अर्ध चन्द्रासन- या आसनात शरीराला अर्धचन्द्रा प्रमाणे फिरवतात. 
 
4 नटराज आसन - हे आसन उभारून केले जाते. या आसनामुळे खान्दे आणि फुफ्फुस बळकट होतात. 
 
5 गोमुख आसन - हे आसन बसून केले जाते .शरीराला व्यवस्थित आकार देण्यासाठी हे आसन केले जाते. 
6 सुखासन- हे आसन देखील बसून केले जाते. या आसनामध्ये नाकातून श्वास घेतात आणि सोडतात. सुखासन तणावा पासून मुक्ती देतो. 
 
7 योग मुद्रासन - हे आसन केल्याने मानसिक बळ आणि तणावापासून मुक्ती मिळते. हे आसन बसून केले जाते. 
 
8 सर्वांगासन- या आसनामध्ये झोपून पायाला वर उचलतात पायात आणि पोटाच्या मध्य 90 अंशाचा कोण बनतो. शारीरिक दृष्टया मजबूती येते.शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो. 
 
9 ताडासन- हे आसन सरळ उभे राहून केले जाते. पायाच्या बोटांवर उभे राहून हे आसन केले जाते. हे आसन पाठीच्या कणासाठी फायदेशीर आहे. उंची वाढण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. 
 
10 शवासन- या आसनामध्ये झोपतात हळुवार श्वास घेण्याची प्रक्रिया केली जाते. मन शांत आणि एकाग्रता वाढण्यासाठी हे आसन केले जाते.     
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती