दररोज हे आसन केल्याने PCOD चा त्रास होणार नाही

बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (19:18 IST)
पीसीओडी चा त्रास आजकाल प्रत्येक महिले मध्ये आढळून येत आहे. या मागील कारणे हार्मोनल असंतुलन, ताण योग्य गोष्टींचे सेवन न करणे इत्यादी आहे. या मुळे ओव्हरी मध्ये  गाठी होऊ लागतात. अशा परिस्थितीत मासिक पाळी मध्ये त्रासाला सामोरी जावे लागते. या समस्येपासून बचाव करण्यासाठी दररोजचा आहार आणि दिनचर्येत काही बदल करून या समस्येपासून बचाव होऊ शकतो. योगा केल्याने देखील पीसीओडी च्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
 
पीसीओडी ची लक्षणे काय आहेत?
* मासिक पाळी अनियमित होणं 
* ओटीपोटात दुखणे 
* थकवा आणि अशक्तपणा जाणवणे 
* वजन वाढण्याची तक्रार होणं 
* पुन्हा-पुन्हा डोकं दुखणे 
* चेहऱ्यावर आणि शरीरावर केस येणं
* केस पातळ होणं आणि केसांची गळती होणं.
* चेहऱ्यावर मुरूम होणं 
 
जर आपण देखील या समस्येपासून त्रस्त आहात तर हे आसन केल्याने आपल्याला आराम मिळेल चला तर मग या आसनाबद्दल जाणून घेऊ या.
 
1 उष्ट्रासन -
हे आसन करण्यासाठी मोकळ्या जागी चटई अंथरून गुडघ्या वर बसा. पाय आणि गुडघ्या मध्ये 2 फुटाचे अंतर ठेवा. 
गुडघ्यावर उभे राहून पाय आणि डोकं हळू-हळू मागे वाकवा.
हात मागे करून टाचांना धरून ठेवा.  
मान देखील मागे वाकवा लक्षात ठेवा की मानेला हिसका बसू देऊ नका.  
दीर्घ श्वास घ्या.
सामान्य अवस्थेमध्ये या. 
अशा प्रकारे हे आसन 5 ते 7 वेळा करा. 
 
2 भुजंगासन -
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर चटई अंथरून पोटावर झोपा. 
दोन्ही हाताच्या मध्ये अंतर राखून मागे ठेवा.
हाताला जमिनीवर ठेवून शरीराला वर उचलून मागे दुमडून घ्या.
दीर्घ श्वास घेत 20-30 सेकंद याच स्थितीमध्ये राहा. 
सामान्य अवस्थेत या. 
या आसनाची पुनरावृत्ती 3 -4 वेळा करा.   
 
हे लक्षात ठेवा 
* पुदिन्याचा चहा प्यायल्याने पीसीओडीची लक्षणे कमी होण्यात मदत मिळते.
* अँटी ऑक्सीडेन्ट आणि बेक्टेरिअल गुणांनी समृद्ध अळशीचे सेवन कारणे देखील फायदेशीर आहे. 
* 1 ग्लास कोमट पाण्यात 2 चिमूट दालचिनी पूड मिसळून प्यायल्यानं त्रास कमी होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती