शरीरात रक्तवाढीसाठी हे आसन करा

शुक्रवार, 28 मे 2021 (18:11 IST)
असं आवश्यक नाही की शरीरात रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण नेहमी औषधांवर अवलंबवून राहावे. चांगले पौष्टीक आणि सकस आहार आणि नियमितपणे योगा केल्याने देखील आपण शरीरातील रक्त वाढवू शकता. आपल्या शरीरात रक्ताच्या कमतरतेला योगाच्या साहाय्याने पूर्ण करू शकतो.चला जाणून घ्या.कोणते आसन केले पाहिजे.
 
* ताडासन- ताडासन केल्याने शरीरात रक्तविसरणं चांगले होते.म्हणून ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे,त्यांनी हे आसन नियमितपणे करावे.हे आसन करायला सोपे आहे.हे कोणीही करू शकतो.आसन योग सुरु करण्याच्या पूर्वी किंवा शेवटी करावे.या आसन मध्ये घेतल्या जाणाऱ्या श्वासोच्छ्वासामुळे रक्तविसरणं सुधारते.
 
* सर्वांगासन- सर्वांगासन केल्याने देखील रक्त वाढते.हे आसन केल्याने  शरीरातील सर्वांगाचा चांगला सराव होतो .पाठीचा कणा बळकट करण्यासाठी देखील हे आसन लोक करतात.हे आसन नियमितपणे केल्याने शरीरातील कार्यप्रणालीमध्ये सुधारणा होते.म्हणून हे आसन नक्की करा. 
 
* शशांकासन-या आसनाचा सराव केल्याने सम्पूर्ण शरीर ताणले जाते,हे मेंदूला देखील शांत ठेवतो.हे आसन केल्याने रक्तविसरणं चांगले होते.आसन करताना लक्षात ठेवा की आपल्या सामर्थ्यानुसारच शरीराला पुढे ताण द्या.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती