मधुमेहाच्या रुग्णांनी रक्ताच्या पातळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी हे काही योगासने करावी. आजच्या काळात आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच स्वतःसाठी पुरेसा वेळ न दिला गेल्यामुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाचे रुग्ण वाढतंच चालले आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यावर मधुमेहाचा त्रास उद्भवतो. मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेच्या पातळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही योगासने केले पाहिजे. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेच्या पातळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या योगासनांचा सराव करायला पाहिजे.