स्लिम बॉडीसाठी योगाचे 5 सोपे उपाय

गुरूवार, 18 जून 2020 (18:15 IST)
आपल्या शरीराला लवचीक आणि सडपातळ बनविण्यासाठी कोणत्याही प्रकाराचे कसरत काम करीत नाही फक्त योगच हे काम करू शकतं. आजकालच्या काळात पुरुषांपेक्षा बायका आपल्या फिगरची जास्त काळजी घेतात. सध्याच्या प्रदूषित वातावरण आणि भेसळयुक्त अन्नामुळे आपल्या शरीराला निरोगी ठेवणे गरजेचे आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे आपल्या शरीराला सडपातळ ठेवता येईल...
 
1 पथ्य : सर्वात आधी आपल्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात अन्न ग्रहण करावे. आहारात सर्व पोषक तत्त्व समाविष्ट करावे. तिखट चमचमीत मसालेदार अन्न खाऊ नये. कडू, तिखट, आंबट, गरम, खारट, आंबट भाजी, तेल, तीळ, मोहरी, मद्य, अंडी, मासे किंवा मांसाहार घेणे टाळावे. रात्रीच्या जेवणानंतर किमान 16 तास काहीही खाऊ पिऊ नये.
 
2 अन्न : सुरुवातीस एकाच वेळी अन्न घ्यावे. रात्री कमी जेवण घ्यावे. जेवणामध्ये सॅलड, सूप, ताक, दही, घ्यावे. अर्धी शिजवलेली भाजी, पोळी, हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळ, आणि फळांचा रस घेणे उपयोगी ठरतं. जेवण्यानंतर पपई, पेरू सारख्या फळांच्या रस घेतल्याने पाचन शक्ती वाढते.
 
3 पाणी : सकाळी उठल्यावर दोन ग्लास गाळलेले पाणी प्यावे. पोटाच्या स्नायूंना वर- खाली हालवावे. आपल्या हवे असल्यास ताडासन, द्विभुज कटी चक्रासन करा. बोअरवेलचे पाणी जड असतं म्हणून चांगले फिल्टर करून पाणी प्यावे. योग्य प्रमाणात पाणी प्यावे. जेवण्यानंतर पाणी न पिणे जास्त चांगले. जेवण्याचा एका तासानंतर पाणी प्यावे.
 
4 योग पॅकेज : आसनांमध्ये अंग संचलन करताना सूर्य नमस्कार, चक्रासन, पादहस्तासन, अर्धमत्स्येंद्रासन, भुजंगासन, नौकासन, आणि धनुरासन करावं. प्राणायामामध्ये अनुलोम-विलोम आणि कपालभाती करावं. ध्यान करण्यासाठी ध्यानाच्या आधुनिक पद्धतीमध्ये ओशोचे डायनॅमिक आणि सक्रिय ध्यान करणे फायदेशीर ठरेल. जे आपल्याला पूर्णपणे सडपातळ होण्यात मदत करेल. 
 
5 शॉर्ट कट : स्लिम होण्यासाठी सर्वात आधी किमान दोन दिवस निराहार राहा. नंतर ज्यूसवर राहा. त्यानंतर स्वल्पाहार मग एवढ्या जेवणावर राहावं की शरीरामध्ये आरोग्य हलके, आणि तंदुरुस्त अनुभवाल. नंतर कुंजल, सूत्रनेती, कपालभाती आणि सूर्य नमस्कारला आपल्या दिनक्रमाचा भाग बनवा आणि कमाल बघा. 
 
हे लक्षात असू द्यावे की हे सर्व वैद्यकीय परामर्शाने करावं. कारण आपल्या सध्याच्या शरीराची स्थिती सांगता येऊ शकत नाही की आपण वरील दिलेल्या नियमांचे पालन करण्यास सक्षम आहात की नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती