जर आपल्याला झोप येत नसेल तर हे करुन बघा

शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (17:09 IST)
योग आणि योगासनात बरीच क्षमता आहे. योग करा म्हणजे आजार होणार नाही. आजार गंभीर नसला तरी ही योग प्रभावी असू शकतो. आज आम्ही इथे आपल्याला सांगत आहोत की रात्री झोप येत नसल्यास केले जाणारे फक्त दोन उपाय ज्यामुळे आपल्याला शांत झोप येणार. 

* झोप न येण्याची कारणं - तसे तर झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात पण दोन कारणं प्रामुख्यानं असू शकतात जसे की शरीराला थकवा न जाणवणं आणि काळजी किंवा सतत दिवसं रात्र विचार करणं. हीच दोन प्रमुख कारणे आहेत म्हणून त्यासाठी येथे दोन उपाय सांगत आहोत.
 
1 प्राणायाम - दररोज झोपण्यापूर्वी किमान 5 ते 10 मिनिटे प्राणायाम करावा. आपण योगनिद्रेचा सराव देखील करू शकता. या साठी आपण शवासनात झोपून आपण शरीराला आणि मन आणि मेंदूला सैल सोडा. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या संपूर्ण शरीराला सैल सोडा. पूर्ण श्वास घेऊन सोडायचा आहे. आता असा विचार करा की आपले हात, पाय, पोट, मान, डोळे सर्व काही सैल झाले आहेत. आता स्वतःला सांगा की मी योगनिद्रेचा सराव करत आहे. 
 
आता आपल्या मनाला शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे हलवा आणि त्यांना सैल आणि तणावरहित असण्याची सूचना द्या. आपल्या मनाला उजव्या पायाच्या अंगठ्यावर घेऊन जा. पायाची सर्व बोटं किमान तळपाय, टाच, पोटऱ्या, गुडघा, मांडी, नितंब, कंबर, खांदा सैलसर होतं आहे. अश्या प्रकारे डावा पाय देखील सैल सोडा. श्वास घ्या आणि सोडा. 
 
आता झोपल्या झोपल्या 5 वेळा पूर्ण श्वास घ्या आणि सोडा. पोट आणि छाती वर खाली होणार. पोट वर खाली होणार. हा सराव दररोज करावं. या मुळे मन थकून झोपून जाणार आणि कोणताही प्रकारचा विचार करणार नाही. 
 
2 सूर्यनमस्कार - शरीराला थकविण्यासाठी आपण झोपण्यापूर्वी 1 तास व्यायाम करा किंवा फक्त 15 मिनिटासाठी सूर्य नमस्कार करा. सूर्य नमस्कार 12 असतात. या सर्व 12 सूर्य नमस्काराची पुनरावृत्ती किमान 12 वेळा करा. 
 
सूचना - 
 
* दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका. 
 
* तामसी जेवण करू नका. रात्री हलकेच जेवण करावं.
 
* दिवसात किंवा दुपारी झोपण्याची सवय सोडून द्या.
 
* कोणत्याही प्रकारचे नशा घेउन किंवा औषधे घेऊ नका.
 
* झोपण्याच्या पूर्वी आपली काळजी आणि विचारांना लांब करून झोपा, करणं जेवढे महत्वाचे अन्न, पाणी आणि श्वास घेणं आहे त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे झोप घेणं.
 
* रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी उशिरा उठणं सोडा.
 
* झोपेची वेळ टाळल्याने झोप कमी होते.
 
* झोप बऱ्याच रोगांना स्वतःच ठीक करण्यास सक्षम असते.
 
* झोपेच्या अभावामुळे डोळ्याभोवती गडद वर्तुळे (मंडळे) बनतात, तसेच डोळ्याभोवती काळपट पणा येतो.
 
* कमी झोपल्यानं मेंदू थकलेला जाणवतो आणि वजन देखील वाढतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती