आरोग्य विम्याची नवी योजना सरकारने लागू केली

गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (08:50 IST)
रेग्युलर हेल्थ इन्शुरन्स Health insurance आणि कोविड स्पेसिफिक कव्हर्स नंतर आपल्याला 1 जानेवारी 2021 पासून स्टॅंडर्ड टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करता येणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी ही योजना आणली आहे. जी सर्व इन्शुरन्स कंपन्यांना सक्तीने लागू करावी लागणार आहे. त्यांना या पॉलिसीची विक्री सरल जीवन बीमा या नावाने करावी लागणार आहे. सर्व इन्शुरन्स कंपन्यांना याची विक्री 1 जानेवारी 2021 पासून करावी लागणार आहे. आयआरडीएआयचे प्रमुख सुभाष खुंटिया यांनी या आधीच अशी पॉलिसी येणार असल्याची  घोषणा केली होती. 
 
या पॉलिसीतून तुम्हाला काय देण्यात येणार आहे?
या पॉलिसीची मुदत 5 ते 40 वर्षे असून 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना ऑफर केली जाणार आहे.‌ या पोलिसीमध्ये तुम्ही कमीत कमी 5,00,000 ते जास्तीत जास्त 25,00,000 इतक्या रक्कमेचं कव्हर (Sum assured) निवडू शकता. तसंच तुम्हाला त्याहून अधिक कव्हर हवं असेल तर सरल जीवन बीमा पॉलिसीचे सर्व नियम तसेच ठेऊन इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तशी पर्यायी विमा पॉलिसी देऊ शकते.
 
तुम्ही रेगुलर प्रीमियम पेईंग टर्म तसेच लिमिटेड पेईंग पिरियड टर्म जसं पाच ते 10 वर्षांचा काळ असतो किंवा सिंगल प्रीमियम पेमेंट निवडू शकता. रेगुलर आणि लिमिटेड पे पॉलिसीचा प्रीमियम दरमहा किंवा सहा महिन्यातून एकदा तसंच वर्षभरात एका हप्त्यात भरू शकता. वार्षिक प्रीमियमच्या दहा पट रक्कम, मृत्युपर्यंत भरलेल्या  प्रीमियमचे105 टक्के रक्कम आणि पॉलिसीधारकाला कंपनीने दिलेली सम अश्युअर्ड यापैकी जी रक्कम सर्वाधिक असेल ती एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यु झाला तर डेथ बेनिफिट म्हणून मिळेल.
 
सिंगल प्रीमियम पॉलिसीमधून Death benefit हा प्रीमियमच्या एका हप्त्याच्या रकमेच्या 125 टकक्यांहून अधिक आणि मृत्युनंतर कंपनीने सांगितलेल्या डेथ बेनिफिटपेक्षा अधिक मिळणार आहे. तसेच ॲडिशनल प्रीमियम भरून विमाधारकांना अपघात आणि कायम अपंगत्व असे दोन पर्याय देण्यात येणार आहेत.
 
पॉलिसी जारी केल्यापासून 45 दिवसांनंतर ती लागू होणार आहे तसेच या दिवसात पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत्यू ग्राह्य धरला जाणार आहे. अन्य कारणांमुळे मृत्यू झाल्यास कर वगळता प्रीमियमची 100 टक्के रक्कम विमाधारकाच्या वारसांना देण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती