आयुष्मान भारत योजना, संपूर्ण माहिती

सोमवार, 27 जानेवारी 2020 (12:39 IST)
भारत शासनाची आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण भारतात राबविण्यात आली. 2018 च्या वित्तीय  अर्थसंकल्प अधिवेशनात ही योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केली. या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मोदी केअर योजना म्हणूनही ओळखले जाते. 
 
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याखालील प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येईल. 10 कोटी बीपीएल धारक कुटुंब (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असतील. 
 
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी 14 एप्रिल 2018 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून या योजनेचा शुभारंभ केला. 
 
वैशिष्ट्ये 
या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करेल. याचा अर्थ असा की या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकते.
 
1 राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना
2 कल्याण केंद्र
 
1 राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना
या योजनेतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या सुमारे 50 कोटी बीपीएल कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे. ह्यात जवळजवळ सर्व माध्यमिक आणि बरीच तृतीय रुग्णालये समाविष्ट आहेत .
 
2 कल्याण केंद्र
आरोग्य आणि निरोगी कल्याण केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवांची यादी 
गरोदरपणात घ्यावयाची काळजी आणि माता आरोग्य सेवा
नवजात आणि मुलांची आरोग्य सेवा
शिशू आरोग्य
तीव्र संसर्गजन्य रोग
संसर्गजन्य रोग
मानसिक आजार व्यवस्थापन
दंत चिकित्सा 
वृद्धांसाठी अतिदक्ष चिकित्सा 
 
एसईसीसी डेटाबेसमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार कोणाला आहे हे ठरविले जाईल. अंदाजे 10.74 कोटी गरीब, वंचित ग्रामीण कुटुंबे आणि विस्तारित शहरी कामगार कुटुंब हे लक्ष्य आहे. ही कुटुंबे एसईसीसी डेटाबेसनुसार ठरविली जाते (ह्यात गावांतील आणि शहरातील) दोन्ही कुटुंब समाविष्ट आहे. 
 
आयुष्मान भारत योजना ऑनलाईन नोंदणी - 
देशातील सुमारे 10 कोटी बीपीएल कुटुंबांना या आरोग्य योजनेचा लाभ देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. इतकेच नव्हे तर या योजनेतर्गत देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या सुमारे 50 कोटी बीपीएल कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सर्व गरीब बीपीएल कुटुंबांना देण्यात येईल. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड केंद्र शासनाकडून केली जाईल. यासाठी केंद्र शासनाने आपली अधिकृत वेबसाइट देखील सुरू केली आहे. शासकीय निवडलेले लाभार्थी त्यांची नावे या (mera.pmjay.gov.in)  संकेतस्थळावर बघू  शकतात.
 
आयुष्मान भारत योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे :-
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला शासना कडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल. या योजनेचा लाभ शासना कडून सुमारे 50 कोटी बीपीएल कुटुंबांना देण्यात येणार आहे.
या योजनेतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे.
एखाद्याचे नाव लाभार्थींच्या यादीमध्ये नसेल आणि ते या योजनेस पात्र असतील तर आयुष्मान मित्राच्या साहाय्याने या योजनेअंतर्गत त्याची नोंदणी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर गोल्डन कार्डही रुग्णालयात बनवले जाते.
या योजनेत, अनेक प्रकारच्या गंभीर आजारांवर उपचार केले जातील, ज्यामध्ये रुग्णास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्चही सरकारकडून खर्च करावा लागतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड आवश्यक आहे.
आपल्या शहरातील किंवा खेड्यातील कोणत्या रुग्णालयाला या योजनेचा लाभ मिळत आहे. रुग्णालयांची यादी पाहून आपण हे शोधू शकता.
 
आयुष्मान भारत योजना ऑनलाईन नोंदणी वेबसाइट -
आयुष्मान भारत योजनेसाठी कोणतीही कर नोंदणी नाही. या योजनेनुसार ज्यांची नावे सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या यादी (एसईसीसी 2011) मध्ये नोंदविली गेली आहेत. केवळ ह्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असल्यास आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास. तो स्वत:चे नाव शासनाने केलेल्या अधिकृत शासकीय किंवा खासगी रुग्णालयात नोंदणी करू शकतो. याशिवाय आयुष्मान मित्राचीही मदत घेता येईल.
याशिवाय अर्जदार सीएससीमार्फत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
आयुष्मान भारत योजनेची विविध माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान जन आरोग्य योजना ऑनलाईन वेबसाइट सुरू केली आहे. या संकेत स्थळावर आयुष्मान भारत लाभार्थी यादी आपण तपासू शकता. ज्यामध्ये आपल्याला लाभार्थीची संपूर्ण  माहिती मिळेल.
आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड सामाजिक-आर्थिक जात गणना (एसईसीसी -2011 ) च्या आधारे या योजनेतर्गत लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती