इतिहास, ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत संयुक्त विजेता

सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (08:09 IST)
ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या अंतिम सामन्यात भारत संयुक्त विजेता बनला आहे. या अंतिम सामन्यात भारतासह रशियाचीही संयुक्तपणे निवड झाली आहे.  इंटरनेट कनेक्शनअभावी भारत आणि रशिया संयुक्तपणे विजयी म्हणून निवडले गेले आहेत.ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत पहिल्यांदा विजेता ठरला आहे. 
 
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDE ने प्रथमच ऑनलाईन स्वरूपात ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. यावेळी, भारतीय संघात कर्णधार विदित गुजराती, माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी, डी हरिका, आर प्रगगनानंद, पी हरीकृष्ण, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी रशियाविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती