महिला हॉकी लीग मध्ये हरियाणा कडून बंगालचा आणि मध्यप्रदेश कडून महाराष्ट्राचा पराभव

सोमवार, 6 मे 2024 (00:35 IST)
राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024 फेज 1 मध्ये शनिवारी हरियाणा ने रोम हर्षक लढतीत बंगालचा 4-3 असा पराभव केला. तर मध्यप्रदेशने महाराष्ट्राचा 2-1 ने  पराभव केला. 

दिवसाच्या सुरुवातीच्या सामन्यात बंगालचा संघ काहीच वेळातच आघाडी घेण्यास यशस्वी झाला आणि सिलबिया नाग(दुसऱ्याच मिनिटात) ने खेळाच्या सुरुवातीला पेनल्टी कॉर्नर ला गोल मध्ये बदलले त्यांनतर सेलेस्टीना होरो(19 व्या मिनिटात ) दुसऱ्या क्वार्टर मध्ये पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतरण करत आघाडी दुप्पट केली.

हरियाणाच्या कर्णधार नीलम हिने(20 व्या मिनिटात) प्रत्युत्तर देत पेनल्टी कॉर्नर गोल मध्ये बदलून दिला. मध्यांतर पर्यंत बंगाल संघ 2-1 ने पुढे होता. नंदनीने 41 व्या मिनिटात हरियाणासाठी एक अजून पेनल्टी कॉर्नरला गोल मध्ये बदलून बरोबर  अंक केले.त्याआधी शशी खासा (43व्या)ने आणखी एका पेनल्टी कॉर्नरमध्ये बदल करून हरियाणाला आघाडी मिळवून दिली. 
 
शेवटच्या क्वार्टरच्या सुरुवातीला पिंकीने (46व्या मिनिटाला) मैदानी गोल करून हरियाणाला 4-2 अशी आघाडी मिळवून दिली. शांती होरोने (51व्या मिनिटाला) मैदानी गोल करत बंगालला पुनरागमनाची संधी दिली, पण हरियाणाने आपली आघाडी कायम राखली आणि विजय मिळवला.
 
दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात मध्यप्रदेश कडून महाराष्ट्राचा  2-1 असा  पराभव झाला. पहिल्या हाफ मध्ये एकही गोल झाला नाही. तर तिसऱ्या क्वाटरमध्ये मध्यप्रदेशच्या अचल साहू ने 45 व्या मिनिटात मैदानावर गोल करत आघाडी घेतली. प्रत्युत्तर देत महाराष्ट्राची कर्णधार अश्विनी कोळेकर हिने 50 व्या मिनिटात शेवटच्या क्वार्टर मध्ये गोल करत गुणसंख्या बरोबर केली. मध्यप्रदेशाच्या स्वातीने 54 व्या मिनिटात गोल करून मध्यप्रदेशाला आघाडी मिळवून देत सामना जिंकला. पुढील सामना मिझोरामचा मणिपूरशी आणि झारखंडचा ओडिशाशी होईल. 
 
Edited By- Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती