ऑस्ट्रेलियन खुली टेनिस : फेडरर लागोपाठ 20 व्या वर्षी तिसर्‍या फेरीत

गुरूवार, 17 जानेवारी 2019 (14:40 IST)
स्वीस टेनिसपटू व जगातील अव्वल दर्जाचा टेनिसपटू रॉजर फेडररने लागोपाठ 20 व्या वर्षी 
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली.
 
फेडरर हा लागोपाठ तिसर्‍या वेळी ऑस्ट्रेलियन खुले ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच या स्पर्धेचे विक्रमी  असे सातवे विजेतेपद मिळविण्याच्या इर्षेने तो मैदानात उतरला आहे. पहिल्या फेरीत फेडररने डेनिस इस्टोनिम याचा पराभव केला; परंतु 28 वर्षांच इस्टोनिने जोरदार लढत दिली.
 
बुधवारी, फेडररने दुसर्‍या फेरीत ब्रिटनचा स्टार खेळाडू डॅन इव्हान्स याचा 7-6 (7-5), 7-6 (7-3), 6-3 असा 
पराभव केला. पहिले दोन सेट टायब्रेकरचे ठरले. इस्टोमिन हा जगात 189 व्या स्थानी आहे. त्यामुळे त्याला सहज नमवता आले; परंतु इव्हन्सविरुध्द वेळ लागला. हा सामनाही लवकर संपेल असे वाटले होते; परंतु हा सामना जिंकण्यास 2 तास 35 मिनिटांचा कालावधी लागला, असे फेडररने स्पष्ट केले.
 
इव्हान्सने टायब्रेकमध्ये 5-3 अशी आघाडी घेतली. टायब्रेकरमध्ये तो पुढे होता तरीही फेडररने पुनरागमन करीत सामना जिंकला व आपल्या आशा जिवंत ठेवल्या. फेडररने इव्हान्सचे कौतुक केले. इव्हान्स सामना मध्येच सोडेल असे वाटले होते. परंतु तसे काहीही घडलेले नाही. फेडरर हा तिसर्‍या फेरीत अमेरिकेच्या टेलर फिटझ अथवा फ्रान्सचा गेल मोनफिल्स यांच्याविरुध्द खेळेल आणि 32 खेळाडूंत स्थान मिळविण्याचा प्रयत्न करेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती