‘एएफसी’ आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने नवी मुंबई, अहमदाबाद आणि भुवनेश्वरमध्ये

शनिवार, 27 मार्च 2021 (11:00 IST)
भारतात २०२२ मध्ये होणाऱ्या AFC वुमन्स आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने नवी मुंबई, अहमदाबाद आणि भुवनेश्वर येथे होणार आहेत. पुढील वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
 
या स्पर्धेतील सामने नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, अहमदाबादचे ट्रान्स्टॅडिया आणि भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर होतील. या स्पर्धेसाठीचे पात्रता सामने १३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. कार्यक्रम पत्रिका २७ मे ला आशियाई फुटबॉल महासंघाच्या मुख्यालयात जाहीर होतील. याशिवाय २०२२ मध्ये १७ वर्षांखालील गटाची कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धासुद्धा होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती