रवि शास्त्री: वाढदिवसानिमित्त विशेष

सोमवार, 27 मे 2019 (16:29 IST)
रविशंकर जयद्रीथ शास्त्री (जन्म 27 मे 1962) हे भारतीय क्रिकेट कमेंटेटर, माजी क्रिकेटपटू आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. खेळाडू म्हणून त्यांनी 1981 ते 1992 दरम्यान भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी टेस्ट आणि एकदिवसीय सामने खेळले आहे. 
 
रवी शास्त्री मंगलोर वंशाचे असून त्याचा जन्म मुंबई येथे झाला आणि त्यानी माटुंगाच्या डॉन बोस्को हायस्कूलमधून शिक्षण घेतले. किशोरवयीन झाल्यावर त्याने गंभीरपणे क्रिकेटकडे लक्ष दिलं. जुनियर कॉलेजचा शेवटच्या वर्षात रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली. 17 वर्षे आणि 292 दिवसांचा असताना तो मुंबईसाठी खेळणारे सर्वात लहान क्रिकेटपटू होते.
 
1981 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळणं सुरु केलं. 1990 च्या इंग्लंड दौर्‍यापर्यंत शास्त्रीचा करिअर फक्त एक कठीन संघर्ष होता. पण त्या दौर्‍यात त्यांनी 3 टेस्ट सामन्यात 2 शतक लावले. गुडघा दुखापतीमुळे त्यांना 1992 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घ्यावा लागला. 1990 दशकाच्या शेवटी शास्त्री यांनी रितु सिंगशी विवाह केला. मार्च 1995 मध्ये मुंबईतील वर्ल्ड मास्टर्स टूर्नामेंटसह त्याने कमेंटेटर म्हणून पदार्पण केले. 
 
जुलै 2017 मध्ये माजी टीम संचालक शास्त्रीला क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) यांनी राष्ट्रीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. करारानुसार त्याला दरवर्षी 8 कोटी रुपये मिळतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती