ऑइल फ्री हेल्दी आणि टेस्टी उत्तपम

मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (13:57 IST)
साहित्य - 2 वाटी रवा, 1 वाटी दही किंवा ताक, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेली शिमला मिरची, 1 टोमॅटो, 100 ग्रॅम पनीर, 1 काकडी, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल किंवा तूप गरज असल्यास, मीठ चवीपुरती.
 
कृती- सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या. त्यात ताक किंवा दही घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा आणि अर्धा तास तसेच ठेवून द्या. नॉनस्टिक तव्यावर तेल किंवा तूप घालून रव्याच्या घोळाला त्यावर पसरवून द्या. आता त्या वर कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो चे बारीक काप, पनीराचे काप, काकडीचे काप पसरवून द्या. आता या वर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीपुरती मीठ घाला. इच्छा असल्यास वरून तूप किंवा तेल सोडावं. आता उत्तपम मंद आचेवर तपकिरी होईपर्यंत शेकून घ्यावं. उत्तपम तयार झाल्यावर एका ताटलीत गरम गरम सांबार किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती