अमरनाथाची पावित्र्य गुहेत शुकदेव आणि कबुतराची पौराणिक कहाणी .....

सोमवार, 27 जुलै 2020 (15:11 IST)
अमरनाथाच्या या पावित्र्य गुहेत भगवान शंकराने भगवती देवी पार्वतीला मोक्षाचा मार्ग दाखवीला होता. या तत्त्वज्ञानाला 'अमरनाथ कथा' म्हणून ओळखले जाते, या कारणास्तव या स्थळाचे नाव 'अमरनाथ' पडले. ही गोष्ट देवी पार्वती आणि महादेवामधील झालेले संवाद आहे. असे संवाद कृष्ण आणि अर्जुनमध्ये देखील झाले होते.
 
जेव्हा देवाधिदेव शंकर हे अमृत ज्ञान देवी पार्वतीस ऐकवत होते तेव्हा तिथे एक शुक (हिरव्या मानेचा पोपट)याचे मूल(बाळ) देखील हे ज्ञान ऐकत होता. पार्वती ही गोष्ट ऐकत ऐकत मधूनच हुंकार भरायचा. पार्वती ही गोष्ट ऐकत ऐकत झोपी गेल्या आणि त्यांचा जागी तेथे बसलेल्या एका शुकाने हुंकार भरावयास सुरू केले.
 
शंकराला ही गोष्ट समजतातच ते शुकाला मारण्यासाठी धावत गेले आणि त्यांनी त्याचा मागे आपले त्रिशूळ सोडले. शुक आपले प्राण वाचविण्यासाठी तिन्ही लोकात धावत असे. धावत धावत ते महर्षी व्यास यांचा आश्रमात जाऊन पोहोचला आणि अती सूक्ष्म रूप घेऊन त्यांचा पत्नी वाटिकाच्या तोंडात जाऊन शिरला आणि गर्भात गेला. अशी आख्यायिका आहे की हा 12 वर्षापर्यंत त्यांचा गर्भातून बाहेरच नाही पडला. तेव्हा खुद्द श्रीकृष्णाने येऊन यांना आश्वस्त केले की बाहेर पडून तुमच्यावर मायेचे काहीही परिणाम होणार नाही, तेव्हाच तो गर्भेतून बाहेर पडला आणि व्यासपुत्र म्हणून ओळखला गेला.
 
गर्भेतच यांना वेद, उपनिषद, दर्शन आणि पुराणाचे योग्य ज्ञान मिळाले होते. जन्मताच शुक श्रीकृष्ण आणि आपल्या आई-वडिलांना वंदून तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघाले. या जगात शुकदेव मुनी म्हणून प्रख्यात झाले.
 
पवित्र जोडपं कबुतराचे : अमरनाथांच्या प्रवासाच्या बरोबरच कबुतरांशी निगडित गोष्ट देखील आहे. या कथेनुसार एके काळी महादेव संध्याकाळच्या वेळी नृत्य करीत असताना त्यांचे सर्व गण आपापसात ईर्ष्यांमुळे कुरु कुरु शब्द उच्चारत होते. त्याच क्षणी महादेवाने त्यांना श्राप दिले की आपण दीर्घकाळापर्यंत हेच शब्द कुरु-कुरु करीत बसा. त्यानंतर ते रुद्ररूपी गण त्याच वेळी कबुतर झाले आणि तिथेच त्यांचे कायमरूपी निवासस्थळ झाले.
 
असे मानले जाते की प्रवासाच्या दरम्यान पावित्र्य अमरनाथ गुहेत या दोन्ही कबुतरांचे दर्शन होतात. आश्चर्याची बाब असे की जेथे प्राणवायू ऑक्सिजनची मात्रा नसल्यामध्ये गणली जाते आणि लांबापर्यंत खाण्या-पिण्याची काहीच सोय नाही, तेथे हे कबुतर कसे काय राहतात ? इथे कबुतराचे दर्शन करणे म्हणजेच साक्षात शिव आणि पार्वतीचे दर्शन करण्यासारखे आहे. असे ही म्हटलं जातं की या कबुतरांनी अमरनाथामध्ये खुद्द शंकराच्या मुखाने अमरत्वाचे प्रवचन ऐकले होते म्हणून देखील ते अमर झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती