मंगळा गौरी पूजा व्रत, आरती, कथा, व उद्यापन

मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच अर्थात लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या किमान पाच नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते. नंतर रात्री जागरण करतात.
 
नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून, सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करुन सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या सवाष्णींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं.
कहाणी मंगळागौरीची
मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. 
मंगळागौरीची आरती
रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाणे, फुगडया, झिम्मा, भेंडया असे साधरणत: 110 प्रकाराचे खेळ खेळतात. 
 
सकाळी उठल्यावर स्नान करून दहीभाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिचे विसर्जन करतात.
 
 
मंगळागौर व्रताचे उद्यापन
मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी केले जाते. असे शक्य नसल्यास इतर कोणी मंगळागौर व्रताचा थाट मांडला असल्यास त्यासोबत व्रताचे उद्यापन करता येतं. पुण्याहवाचन ठेवण्याकरिता होमहवनासाठी भटजींना बोलावतात. त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. आई वडिलांना वाण दिले जाते. मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे. तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे. यामागे मंगळागौरीची पारंपरिक कथा आहे. या कहाणीतला नवरदेव अल्पायुषी असतो. त्याला दंश करण्यास साप येतो. पण त्या नववधूच्या मातेने मंगळागौरीचे व्रत केल्याने हा नवरदेव वाचतो. त्यावेळी त्या सापाचे रूपांतर हारात होते. म्हणून याच्या उद्यापनाला आईला वाण म्हणून यामध्ये एकसर (काळेमणी आणि सोन्याचा मणी) जोडवी, कूंकू, कंगवा आरसा असे दिले जाते. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती