शरद पौर्णिमा 2019 : या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला, या एका मंत्राने देवी होईल प्रसन्न

शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी पूजन केल्याने देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची वर्षभर आपल्यावर कृपा राहते. या व्यतिरिक्त मनोबल वाढतं आणि आकर्षण देखील वाढतं. हा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे. कारण या दिवशी समुद्र मंथन करताना देवी लक्ष्मी अवतरित झाल्याचे सांगितलं जातं. या दिवशी मनोइच्छित कामना पूर्ण होते. या दिवशी लक्ष्मी पूजन अवश्य करावे आणि देवला प्रसन्न करण्यासाठी ह्या एका मंत्राचा जप करावा. 
 
मंत्र
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः
 
या व्यतिरिक्त लक्ष्मीपूजन श्लोक देखील उच्चारण करणे योग्य ठरेल
 
सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकै- र्युक्तं सदा यक्तव पादपकंजम्।
परावरं पातु वरं सुमंगल नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ऊं महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।[४]

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती