सचिन तेंडुलकर : आजही 13‍ शिक्के जोपसलेले

गुरूवार, 23 एप्रिल 2020 (20:48 IST)
क्रिकेचा देव म्हटल्यावर लगेच लाडक्या सचिनचं नावं आठवतं. क्रिकेट जगात या देवाची पूजा केली जाते त्याबद्दल मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत सर्वांना सर्वच काही माहीत असतं. तरी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिनबद्दल काही गोष्टी जाणून घ्या-
 
मास्टर ब्लास्टर हे त्याचं टोपण नाव पण सचिन या नावाची निवड त्याच्या वडिलांनी प्रसद्धि संगीतकार एस.डी बर्मन यांच्या नाववरुन केली होती.
सचिन दुसऱ्या खेळांडू बरोबर खेळाताना त्याचे कोच स्टंप वर एक शिक्का ठेवत होते आणि सचिनला बाद करणार्‍या खेळाडूला तो शिक्का देत असे. पण सचिन बाद झाला नाहीस तर तो शिक्का सचिनला मिळायच. असे 13‍ शिक्के आजही सचिनकडे आहे.
रणजी सामना खेळणार सचिन आजवरचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने वयाच्या 14 व्या वर्षी रणजी सामान्यांमध्ये खेळायला सुरुवात केली.
सचिनला फास्ट बॉलर व्हायचं होतं परंतू तो सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. M.R.F फाउंडेशन च्या डेनिस लिली यांनी सन १९८७ मध्ये सचिन ला खरेदी केले आणि लिली यांनी सचिनला फक्त फलंदाजी वर लक्ष द्यायला सांगितले.
सचिन ने पहिल्या टेस्ट सामन्यात सुनील गावस्कर यांनी भेट दिलेले पॅड घातले होते.
सचिन‍ लिखाण डाव्या हाताने करत असला तरी फलंदाजी उजव्या हाताने करतो.
वयाच्या वीस वर्षाच्या आत असताना सचिनने कसोटी कारकिर्दीमध्ये 5 शतके ठोकली होती.
सचिन तेंडूलकर एकमेव फलंदाज आहे ज्याने वर्ल्डकपमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला.
2008 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये मोहाली येथे झालेल्या सामन्यात सचिनने सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला तेव्हा मैदानात जल्लोष आणि आतिशबाजीमुळे 20 मिनिटे खेळ थांबविण्यात आला होता.
सचिन फलंदाजी करत असताना त्याची पत्नी अंजली अन्न-पाणी ग्रहण करत नव्हती.
भारत सरकारकडून सचिन तेंडूलकर यांना पद्मविभूषण, राजीव गांधी अवार्ड, महाराष्ट्र भूषण अवार्ड, पद्मश्री, अर्जुन अवार्ड आणि भारत रत्न या सर्व पदांनी सन्मानित केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती