महाराष्ट्रात होणार सर्वात मोठी भरती

एसटी महामंडळात मोठी नोकर भरती होणार आहे. मात्र मागील दोन वर्षात महामंडळात रिक्त जागा झाल्या होत्या मात्र त्यावर नेमणुका केल्याच नाहीत. त्यामुळे 15 हजार रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत. यातमध्ये प्रामुख्याने चालक, वाहकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याअगोदर 2014 साली एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. मात्र 2014 ते 16 या काळात दोन सालात एकही जागा भरली नाही. 
 
एसटी महामंडळासाठी वर्ग-1 ते वर्ग-4 साठी 1 लाख 26 हजार 115 जागा मंजुर आहेत. तर यात 1 लाख 4 हजार 398 मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण 22 हजार 24 हजार जागा रिक्त असून यामध्ये 6 हजार 902 ही बढतीतील पदे तर 15 हजार 122 सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणार्‍या पदांचा समावेश आहे.
 
तर यावेळी सरळ सेवेत असणार्‍या पदांमध्ये चालक, वाहकांसह कारागिर, सहाय्यक कारगिर यांची पदे मोठी आहेत.  सध्या 36 हजार 732 चालक असून आणखी 2 हजार 977 चालकांची गरज आहे. तर 34 हजार 807 वाहक कार्यरत असून आणखी 3 हजार 963 वाहकांची कमतरता महामंडळाला भासत आहे. कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही 5 हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-4 मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर मोठी भरती असल्याने यातील भरती योग्य व्हावी याकरिता म्हणून एका खाजगी कंपनीला कंत्राट दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा