'सव्वा रुपयात लग्न' उपक्रमाची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ' मध्ये नोंद

शुक्रवार, 10 मे 2019 (10:17 IST)
शिर्डीत अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर 'सव्वा रुपयात लग्न' या उपक्रमा अंतर्गत ५५ जोडप्यांचे शुभमंगल थाटात संपन्न झाले. मागील १८ वर्षात १८५० जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी सुरू केलेल्या या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह चळवळीची नोंद लंडन येथील 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये झाली आहे. 
 
शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैकासबापू कोते, त्यांची पत्नी आणि आजी नगराध्यक्ष सौ.सुमित्रा कोते या कुटुंबाने २००२ साला पासून शिर्डीत ‘सव्वा रुपयात लग्न’ ही सामाजिक चळवळ हाती घेतली आहे.दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हे लग्न होतात. महारष्ट्रासह गुजरात,मध्यप्रदेश, गोवा या बाहेरील राज्यातील कुटुंबे येथे येऊन आपल्या मुलांमुलींचे लग्न लावतात. मंगळवारीअक्षय तृतीयेच्या रात्री ५५ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यामध्ये ११ आंतरजातीय, ७ बौध्द, मुस्लीम ८ व २९ हिंदू असा समावेश आहे. 
 
यावेळी वधु-वरांना पोशाख, बुट, चप्पल, संसारोपयोगी भांडी, सोन्याचे मंगळसूत्र भेट देण्यात आले. वधूवरांचे कन्यादान आयोजक कैलास बापू कोते.सौ सुमित्रा कोते यांनी केले. या विवाह सोहळ्यातून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’, ‘स्त्री भ्रुण हत्या टाळा’, ‘हुंडा घेऊ नका- देऊ नका’ ‘वृक्षारोपन करा’,’शेतक-यांनो आत्महत्या करु नका’, ‘आपल्या मुला-मुलींचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यातच करा’,’अनावश्यक खर्चास फाटा दया’ असे  संदेश यावेळी देण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती