महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, या ठिकाणी यलो अलर्ट

रविवार, 5 मे 2024 (10:52 IST)
राज्यातील अनेक भागात उकाडा वाढला आहे. राज्यात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात हवामान सातत्याने बदलत आहे. कुठे कडक ऊन तर कुठे पावसाची स्थिती आहे. 

ठाणे, मुंबईत आज तापमान वाढण्याची शक्यता आहे. कोकणांत उन्हाचे चटके जाणवणार आहे. कोकणांत उन्हाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हवामान खात्यानं उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
मुंबईत सकाळी धुकं तर दुपारी कडक ऊन जाणवत आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह उपनगरातील तापमानांत वाढ होणार असून मुंबईचे तापमान 25 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
6 ते 7 मे रोजी मराठवाड्यातील नांदेड, लातूर जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली असून या ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, या ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
राज्यात शनिवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. अकोलाचे तापमान 44.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. अमरावतीत 43 , बुलढाणा 40 , मालेगाव 42 तापमान नोंदवले गेले. तर चंद्रपूर येथे 43.8, तापमानाची नोंद केली. 

Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती