यूपीएससी परीक्षांचा निकाल जाहीर, गिरीश बडोले राज्यात पहिला

भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कसगी गावातील गिरीश बडोले हा राज्यात पहिला तर देशातून विसावा आला. दुरूशेट्टी अनुदीप हा देशात पहिला आला आहे. नागनवाडी (ता. चंदगड) येथील किरण चव्हाण यांनीही या परीक्षेत बाजी मारली. कोल्हापुरातील प्री-आयएएस सेंटरमधील चंद्रशेखर रामेश्‍वर घोडकेही उत्तीर्ण झाले. ते मूळचे आंबेजोगाई येथील आहेत.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2017 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल जाहीर झाला. देशभरात दुसर्‍या क्रमांकावर अनु कुमारी आणि तिसर्‍या क्रमांकावर सचिन गुप्‍ता आहे.  विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत 1058 उमेदवारांना यश मिळाले आहे. राज्यातील आठ विद्यार्थ्यांना पहिल्या शंभरीत स्थान मिळाले आहे. राज्यभरातील 80हून विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.  यूपीएससीमध्ये मराठीचा टक्का यंदाही चांगला आला आहे. यावेळच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य परीक्षा झाल्यानंतर अगदी दोन महिन्यांत निकाल  जाहीर करण्यात आला आहे.  महाराष्ट्रातून पहिला आलेल्या बडोलेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. उस्मानाबाद सारख्या ग्रामीण भागातील मुलगा युपीएसी परीक्षेत अव्वल ठरल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
 
राज्यभरातील दिग्विजय बोडके (54), सुयश चव्हाण (56), भुवनेश पाटील (59), पियुष साळुंखे (63), रोहन जोशी (67), राहुल शिंदे (95), मयुर काटवटे (96), वैदेही खरे (99) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत देशातील पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. वल्लरी गायकवाड देशात 131 वी आली. तर यतिन देशमुख (159), रोहन बापूराव घुगे (249), श्रीनिवास वेंकटराव पाटील (275), प्रतिक पाटील (366), विक्रांत मोरे (430), तेजस नंदलाल पवार (436), दिग्वीजय पाटील (482) स्वागत पाटील (486), अभयसिंह देशमुख (503), तुषार जाधव (528),  वैभव गायकवाड (551), अमोल पवार (633), प्रेमानंद दराडे (650),  अमित शिंदे (705), किशोर धस (711), पूणम ठाकरे (723), निलेश तांबे (733), रोहित गुट्टे (734), चंद्रशेखर घोडके (745), विशाल नरवडे (751),  निलेश शिंदे (753),  सचिन पाटील (762), मोनिका घुगे (765),  किरण चव्हाण (779), विशाखा भदाने (783), शशांक माने (797), अमित काळे (812), अनिल खडसे (823), हर्षल पाटील (833), महादेव धारुरकर (857), नेहा निकम (861), अविनाश शिंदे (864), आकाश कोळी (928), स्नेहल भापकर (981), महेंद्र वानखेडे (988) यांनीही परीक्षेत चांगले यश मिळवले आहे.
 
निकाल जाहीर केेलेल्या यादीत खुल्या प्रवर्गातून 543 जणांची निवड करण्यात आली.   ओबीसी गटातून 275उमेदवारांची यादी जाहीर तर एससी 166 आणि एसटी गटातून 74 अशा एकूण 1058 उमेदवारांचा समावेश असून आयोगाने 132 उमेदवारांची राखीव यादी जाहीर केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती