अरे बाप्परे, पाणी समजून आयुक्तांनी बॉटलमधील सॅनिटायझर प्यायले

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (16:11 IST)
मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे बजेट मांडायला सुरुवात करण्यापूर्वी सह आयुक्त रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायले. पाणी आणि सॅनिटायझरची बॉटल एकत्र होती, पाणी समजून आयुक्तांनी या बॉटलमधील सॅनिटायझर प्यायले, ही चूक त्यांच्या लगेच लक्षात येताच शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी त्यांना तातडीने पाणी बॉटल दिली. थोड्या वेळाने त्यांना बरे वाटले आणि त्यांनी अर्थसंकल्प अहवाल वाचण्यास सुरुवात केली. शिक्षण विभागाचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची तब्येत ठीक नसल्याने रमेश पवार यांच्यावर अर्थसंकल्प वाचनाची जबाबदारी सोपविण्यात आली.
 
जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. तत्पूर्वी शिक्षण विभागाने २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला, सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती