नकली शिवसेना संबंधित टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार, म्हणालेत-भाजप बोगस जनता पार्टी

गुरूवार, 25 एप्रिल 2024 (10:06 IST)
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आणि आणि भाजपाला बोगस जनता पार्टी असे संबोधन दिले. यापूर्वी भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना असे संबोधले होते. 
 
मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पक्षमध्ये प्रचार करतांना उद्धव ठाकरे यांनी पूर्व काँग्रेस नेता अशोक चव्हाण यांचे भाजपात सहभागी होण्याचे सांगितले. ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधण्यासाठी आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळा मुद्द्याला हात घातला. ते म्हणालेत की, अशोक चव्हाण यांना पार्टीमध्ये सहभागी करून सत्तेत असलेली पार्टी आता करोडो रुपयांच्या आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळ्याचा भाग बनली आहे. हिंगोली मध्ये शिवसेना उमेदवार नागेश अष्टीकर यांच्या बाजूने एक रॅलीला संबोधित करत ठाकरे म्हणालेत की, चोरांनी मूळ शिवसेनेला चोरून घेतले. पण ते तोपर्यंत शांत राहणार नाही जोपर्यंत हिशोब बरोबर होत नाही. 
 
उद्धव ठाकरे म्हणालेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, आमची शिवसेना नकली शिवसेना आहे. मोदींना माहित नाही की, भाजप बोगस पार्टी बनली आहे. उद्धव ठाकरे म्हणालेत की, जर त्यांच्या बरोबर कोणताच विश्वासघात झाला नसता तर, त्यांनी पाच वर्षानंतर शेतकऱ्यांचे ऋण माफ करून दिले असते. त्यांनी भाजपाला  महाराष्ट्र विरोधी देखील करार दिला. 
 
उद्धव ठरते हे आदर्श हौसिंग घोटाळा या मध्ये असलेले आरोपी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे गृहक्षेत्र नांदेड शहरावर देखील बोललेले. आरो आहे की, दक्षिण मुंबई मध्ये 31 मजली पॉश इमारतीचे निर्माण रक्षा मंत्रालयच्या जमिनीवर विना आवश्यक मंजुरी नसतांना केले गेले होते. उद्धव ठाकरे यांनी आरोप लावले की, आदर्श घोटाळा केस मध्ये अजून पर्यंत कोर्टातून निकाल लागलेला नाही आणि भाजपने अशोक चव्हाण यांना पार्टीमध्ये सहभागी अरुण घेतले आणि त्यांना राज्यसभा सदस्य देखील बनवले. अश्या प्रकारे भाजप देखील आता आदर्श सोसायटी घोटाळ्यामध्ये सहभागी आहे. 
 
त्यांनी दावा केला की, व्हिडीओ आहे ज्यामध्ये बोलले दिवटे आहे की, आदर्श सोसायटीची निर्मिती केली गेली आणि शहिदांच्या कुटुंबांना मूर्ख बनवले गेले पण चव्हाण हे भाजप मध्ये सहभागी झाल्यानंतर स्टेजवर त्यांचे कौतुक केले गेले.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती