महाराष्ट्रातल्या दंगलीसाठी उद्धव ठाकरे जबाबदार.. नितेश राणेंचा आरोप

बुधवार, 10 मे 2023 (20:47 IST)
भाजपचे नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्रातल्या दंगलीसाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?
महाराष्ट्रातल्या दंगलींसाठी कोणी जबाबदार असेल तर उद्धव ठाकरेच आहेत. 1999 पासून त्यांना मुख्यमंत्रिपदाची लालसा होती. त्यासाठी त्यांनी दंगली घडवण्याचे आदेश दिले होते,असा थेट आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. गृहमंत्रालयाने याचा तपास करावा, असेही राणे यांनी म्हटले आहे.
 
ते पुढे म्हणाले कि संजय राऊत आमच्या नेत्यांवर टीका करत आहे. तुम्ही टीका करत राहा आम्ही आदित्य ठाकरेंचे कपडे फाडत राहू. संजय राऊत लँडमाफिया आहे. याचे पुरावे महाराष्ट्राला देऊ का? असा सवाल करत नितेश राणेंनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.
 
यावेळी नितेश राणेंनी संजय राऊतांना थेट इशारा देखील दिला आहे. ते म्हणाले कि संजय राऊतांनी अलिबागला एक प्लॉट मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावाने दमदाटी करुन विकत घेतला. राऊतांनी किती लोकांच्या जमिनी बळाकावल्या आहेत याचा हिशोब द्यावा. आमच्या लोकांवर तोंडसुख घेण्यापेक्षा तुझे बघ, असा थेट इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
 
नितेश राणे म्हणाले, कैदी नं 8959 संजय राऊत आज बेलवर बाहेर आहे. गेल्या 9 महिन्यांपासून संजय राऊत अशांतता पसरवण्याचे काम करत आहे. बेळगावच्या लोकांनी राऊतांचे ऐकून चुकीच्या माणसाला मतदान करु नका, असे आवाहन मी त्यांना करतो.
 
अजून पुढे ते म्हणाले कि महायुतीच्या सरकारवर दंगली भडकावण्याचे आरोप उद्धव ठाकरे करत आहेत. 1993-93 च्या दंगलीनंतर शिवसेनेचे सरकार आले तसे प्लॅनिंग उद्धव ठाकरे करत होते. मुस्लमानांवर हल्ले करण्याचे आदेश ठाकरेंनी दिले होते. त्या दंगलींचा फायदा शिवसेनेला होईल, याबाबत उद्धव ठाकरेंना मला प्रश्न विचारायचा आहे असे आदेश तुम्ही दिले नव्हते का? याचे उत्तर द्या. गृहमंत्रालयाने याबाबत तपास करायला हवा.
 
त्याच बरोबर अग्रलेख कोणाच्या सांगण्यावर लिहित आहेस? उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावर करत आहात का जाहिर करा. संजय राऊत राष्ट्रवादीत जाण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, गृहमंत्रालय आव्हाडांच्या वक्तव्याची दखल घेईल. तुम्ही लटकावण्याची भाषा कराल तर आम्ही सुद्धा फटकावण्याची भाषा करु.असं भाजपचे नेते नितेश राणे म्हणाले आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती