आता विठ्ठल दर्शनासाठीही टोकन व्यवस्था

येत्या आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील वारकऱ्यांना रांगेशिवाय थेट विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीनं त्रिलोक सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार करुन ही व्यवस्था त्यांच्याकडे सोपवली आहे. याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

तिरुपती, वैष्णोदेवी आणि शिर्डीमध्ये जशी सिस्टीम आहे तशीच टोकन व्यवस्था पंढरपूरमध्येही असणार आहे. त्रिलोक सिक्युरिटी सिस्टिम ही एजन्सी हे काम बघणार आहे. शहरात 30 ठिकाणी हे टोकन मिळतील. एका मिनिटात 45 भाविकांना दर्शन मिळणार. तर एका दिवसात 70 हजार भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती