सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार : नवनीत राणा

मंगळवार, 23 मार्च 2021 (15:03 IST)
खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सावंत यांनी खुलासा करत आरोप फेटाळून लावला. मात्र, आता नवनीत राणा आक्रमक झाल्या असून, सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.
 
राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी धमकावल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. या आरोपांवर खासदार सावंत यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, आता नवनीत राणा यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. “आपण तक्रार दाखल करणार (शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्याविरुद्ध) आहे,” असं नवनीत राणा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती