दुसऱ्या एका वाघिणीच्या मुत्राच्या गंधाने T1 वाघिणीला जेरबंद करण्याचे वन विभागाचे प्रयत्न

बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (11:22 IST)
यवतमाळ जिल्ह्यातील T1 वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत त्यात आता वाघिणीला विशिष्ट जागेवर यावी आणि तिथे तिला जेरबंद करता यावे यासाठी वनविभागाने एक वाघिणीचे मूत्र या भागात आणले आहे आणि याच माध्यमातून ती वाघीण आकर्षित होईल असा विश्वास वन विभागाला असल्याने त्यांनी हा प्रयत्न केला आहे. अनेक महिन्यापासून या वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहे. अगोदर वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी अनेक प्रयत्न केले यात हत्ती मागविले त्यातील एक हत्ती ने धुमाकूळ घातला त्यानंतर इटालीयन डॉग आणले मात्र ते जंगलात फिरून कंटाळले त्यामुळे ते परत गेले त्याच दरम्यान जंगलात उंचावरून उडणारे पेरा मोटर आणले ते सुद्धा खाली पडले आणि ते फेल गेले असे सारे प्रयन्त करून झाल्यावर आता वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आत एक वाघिणीचे मूत्र वापरून तील आकर्षित करून तिला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न चालविले यात यश मिळेल अशी वन विभागाला आशा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती