वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो, अमृता फडणवीस याचं ट्विट

शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (16:59 IST)
विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं यश मिळवलं. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याचदरम्यान आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेतली आहे.  याचदरम्यान ''वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'', असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे. 
 
राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का दिला आणि घवघवीत यश मिळवले आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपाला लक्ष्य केले जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती