ते कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणाला पाठिशी घालणार नाहीत

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (16:51 IST)
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री डोळे मिटून गप्प बसलेले नाहीत, ते कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणाला पाठिशी घालणार नाहीत”, अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. 
 
संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिले. “तुम्हाला काय वाटतं? राज्याचे मुख्यमंत्री शांतपणे बसले आहेत का? राज्यात कोण काय बोलतंय याकडे त्यांचं लक्ष आहे. ते जागरूक मुख्यमंत्री आहेत. त्यांचं प्रत्येक घडामोडीकडे लक्ष आहे. कोणत्याही गोष्टीचा तपास पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर बोला. मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणालाही पाठिशी घालणार नाहीत”, असं राऊत म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती