वाहन चालवण्यासाठी सर्वात वाईट शहर 'मुंबई'

शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (10:25 IST)
जगातल्या १०० शहरांपैकी मुंबई हे वाहन चालवण्यासाठी सर्वात वाईट शहर असल्याचा निष्कर्ष या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे. वाहनांचे पार्ट बनवणाऱ्या मिस्टेर ऑटो या युरोपातल्या आघाडीच्या कंपनीने जगभरातल्या १०० प्रमुख शहरांमधल्या परिस्थितीचा अभ्यास केला. अभ्यास करण्यात आलेल्या १०० शहरांमध्ये मुंबई सगळ्यात शेवटच्या म्हणजेच १००व्या क्रमांकावर असून कोलकाता ९८व्या क्रमांकावर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, सुरक्षा आणि किंमत या तीन घटकांवर आधारीत हा अभ्यास करण्यात आला. या तीन प्रमुख घटकांचे पुन्हा १५ उपघटक करून त्यावर आधारीत निरीक्षणं निष्कर्षात नोंदवण्यात आले आहेत.
 
कॅनडातील कलगरी शहर या अभ्यासात वाहन चालवण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि चांगलं शहर ठरलं आहे. सुटसुटीत वाहतूक, अपघातांचं कमी प्रमाण आणि स्वस्त वाहतूक पर्याय या आधारावर कलगरीने बाजी मारली आहे. त्याखालोखाल स्वित्झर्लंडमधील बर्न आणि टेक्सासमधल्या एल पासो शहराचा क्रमांक लागतो. दुबई आणि कॅनडातलंच ओट्टावा हे शहर देखील सर्वोत्कृष्ट शहरांच्या यादीमध्ये आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती