नीरव मोदींच्या बंगल्यात सापडल्या 'या' दुर्मिळ वस्तूंचा खजिना

शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (20:15 IST)
रायगड जिल्यातील अलिबाग येथील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बंगल्याविरोधात कारवाई करत आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बांगला जमीनदोस्त केला.मात्र, या बंगल्यात निजाम काळातील पडदे, महागडी पेंटिंग्स आई आणि ३० लाखांची लिलावात घेतलेली लाकडी कार सापडली आहे. 
 
कारवाईदरम्यान ईडी आणि आयकर विभागाने छापा टाकून काही प्रसिद्ध चित्रकारांच्या १२५ हुन अधिक पेंटिंग्स जप्त केली आहेत. तसेच हैद्राबादच्या निजामाशी संबंधित अंदाजे १०० वर्षापूर्वीचे जुने पडदे आणि हॉंगकॉंगमध्ये लिलावात २० लाखांना विकत घेतलेली लाकडी कारचे मॉडेल सुद्धा आढळून आले आहे.  उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांना नीरव मोदींच्या बंगल्यात दुर्मिळ वस्तूंचा खजिना सापडला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती