मराठा समाजला कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही; नारायण राणे यांचा पुनरुच्चार

शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (08:59 IST)
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. या मागणीला राणे यांनी आक्षेप घेतला. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावे, या मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी तीव्र विरोध केला आहे.

सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे. कुठलाही 96 कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मी स्वत: मराठा असून आयुष्यभर कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असा पुनरुच्चार राणे यांनी गुरुवारी (19 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केला. 
 
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. या मागणीला राणे यांनी आक्षेप घेतला. मराठा आणि कुणबी यामध्ये फरक आहे. जरांगे-पाटील एकच आहे असे म्हणत असतील तर ते एकच नाही. त्यांनी आधी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. कुठल्याही जातीला किंवा वर्गाला आरक्षण देताना घटनेचे कलम पाहावे. मी मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष असताना याचा भरपूर अभ्यास केला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही. 96 कुळी मराठा वेगळा आणि कुणबी मराठा वेगळा आहे.






Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती