घ्या, विद्यार्थ्यांना अभ्यासच टेन्शन असतच

गुरूवार, 11 एप्रिल 2019 (17:08 IST)
मुंबईतील 10 ते 18 वयोगटातील मुलांना दैनंदिन अभ्यास, परीक्षा, शिकवण्या यामुळे पालकांच्या अपेक्षा यांचा ताण विद्यार्थ्यांवर अधिक असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील वाढत्या तणावाबाबत स्कूलड्यूड डॉट कॉम संस्थेतर्फे देशातील महत्त्वांच्या शहरामध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये मुंबईतील शालेय विद्यार्थी सर्वाधिक तणावाखाली असल्याचे उघड झाले आहे. मुंबई, बंगळूर, चेन्नई, नवी दिल्ली, पुणे अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद या आठ महत्त्वाच्या शहरांमध्ये हा सर्वे करण्यात आला. यामध्ये शाळा आणि शैक्षणिक पद्धतीचा विद्यार्थ्यांवर किती परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. 
 
सर्वेक्षणामध्ये 10 ते 18 वयोगटातील पाच हजार बालकांची पाहणी करण्यात आली. यामध्ये मुंबईतील 2 हजार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 80 टक्के म्हणजेच 1600 विद्यार्थ्यांना शालेय व शिक्षणकेंद्री ताणाचा सामना करावा लागत असल्याचे असल्याचे निदर्शनास आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती