म्हणून तूर्तास तरी 'हा' दौरा पुढे ढकलण्यात आला

शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (09:54 IST)
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे अखेर श्रीराम मंदिर उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आपल्या मंत्रिमंडळासाठी तिथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्यास सज्ज झाले. पण तूर्तास तरी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.  याआधी  रामलल्लाच्या दर्शनाला संपूर्ण मंत्रिमंडळासह जाण्याचे तिघांनीही निश्चित केले. येत्या सोमवारी म्हणजेच 5 फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळासह शिवसेना, भाजपा आणि अजित पवार गटाचे आमदार, खासदार रामलल्लाच्या दर्शनाला जाणार होते. त्याला आता दोनच दिवस बाकी असताना तूर्तास तरी हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
 
राम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती अतिशय मोहक असून मंदिराच्या उद्घाटनानंतर भक्तांचा पूर आल्याचे चित्र आहे, भाविकांची गर्दी तिथे कायम आहे. त्यात व्हीआयपींच्या येण्या जाण्यामुळे सर्वसामान्यांच्या दर्शनात अडचणीही येत आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोळ्यांवर शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून लेझर ट्रिटमेंट करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या ठाण्याच्या घरी परतले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या दोन कारणास्तव शिंदे सरकारने अयोध्या दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती